Sunday, June 14, 2020

लोकमान्य टिळक माहिती

                 लोकमान्य टिळक
                 जन्म :23 जुलै 1856
                 मुत्यू :1 आगस्ट 1920


     केशव तथा बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीस झाले. बालपणापासून त्यांची बुद्धिमत्ता प्रखर होती. वडिलांची बदली पुण्यात झाल्याने माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले.
   
   टिळक पुण्यात आल्यावर त्यांच्या मातोश्री चे निधन झाले. तसेच मॅट्रिकच्या वर्गात असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. व विवाह सत्यभामा यांच्याशी संपन्न झाला.
 
  1872 साली मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी डेक्कन प्रवेश घेतला. एका मित्राने त्यांच्या नाजूक तब्येतीची चेष्टा केल्यामुळे एक वर्ष भरपूर व्यायाम व सकस आहार घेऊन त्यांनी आपली तब्येत बलशाली केली. 1876मध्ये ते गणित हा विषय घेऊन बी. ए प्रथमववर्गामध्ये उत्तीर्ण झाले. 1879 मध्ये ते एल. एल. बी झाले कायधाच्या अभ्यासाची आवड असल्यामुळे सूक्ष्म अभ्यास केला.
      टिळक व आगरकर यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा होत होती. देशाची स्थिती सुधारण्यासाठी, प्रगती साठी राष्ट्रीय शिक्षण हा रामबाण उपाय आहे हे त्यांनी जाणले होते. पुण्यात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 1 जानेवारी 1880 मध्ये 'न्यू इंग्लिश स्कुल ' ची स्थापना केली, या शाळेत पगार न घेता त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 1881 साली चिपळूणकर, टिळक इत्यादी मंडळींनी एकत्र येऊन समाज जागृती साठी 'केसरी ' हे मराठी आणि 'मराठी 'हे इंग्रजी अशी दोन सप्राधीक वुत्तपत्रे सुरु केली. केसरीचे संपादक आगरकर, तर मराठीचे संपादक टिळक होते.

   मराठा आणि केसरी या वुत्तपत्रांतून कोल्हापूर आणि सातारा येथे घडलेल्या प्रकरणांवर कडक शब्दांत टीका केल्याने, इंग्रजांनी टिळक आणि आगरकर यांना शिक्षा सुनावली. सामाजिक सुधारणेचा पुरस्कार करणारे आगरकर व राजकीय सुधारणा अगोदर व्हाव्यात, असे आग्रही मत मांडणारे टिळक यांच्यात मतभेद झाले.

   परकीय सत्तेशी लढा देण्यासाठी, जनमत संघटित करण्यासाठी त्यांनी 'गणेशोत्सव 'व 'शिवजयंती 'हे सार्वजनिक उत्सव सुरु केले. या सार्वजनिक उत्सवांमुळे समाज जागृती झाली. क्रांती पर्वाला भारतीय राजकारणास सुरुवात झाली. 12में 1908च्या केसरीमध्ये लिहिलेल्या 'देशाचे दुदैव 'या लेखाबद्दल टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मंडाले येथील तुरुंगात असताना त्यांनी 'गीतारहस्य 'हा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला. चिरोल यांनी 'भारतीय असंतोषचे जनक 'या शब्दात टिळकांचा यथोचित गौरव केलेलाच आहे.

   ''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच '' अशी गर्जना त्यांनी केली. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रखर राष्ट्रवादाचा प्रसार झाला.

  8जून 1914 रोजी टिळकांची सुटका झाली. साऱ्या समाजाने त्यांना 'लोकमान्य 'ही पदवी बहाल केली.
 
   लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त
   लोकमान्य टिळक बाल संस्कार
   लोकमान्य टिळक शैक्ष निक कार्य
 लोकमान्य टिळक एक क्रांतीकारी युग 

No comments:

Post a Comment

Tata's COVID-19 test kit to detect Omicron variant gets IMCR nod: All you need to know about 'OmiSure'

The Indian Council of Medical Research on Wednesday announced that it has approved a kit designed to detect the Omicron variant of coronavir...