जरा एकदा ठिकाणी पाठ किंवा सत्संग सुरु असेल अथवा तुम्ही गुरूंच्या दर्शनासाठी गेला असाल, तर सर्वप्रथम गुरुजींना साष्टांग दंडवत (आठ अंगानी, पूर्ण अधोमुखी झोपून )घालावा. त्यानंतर संत ग्रंथ साहेब व प्रतिमा जशा की कबिरसाहेबाची प्रतिमा, गरिबीदासजी महाराजांची, स्वामी रामदेवा नंदजी व गुरुजी (रामपालजी )यांच्या प्रतिमांना दंडवत घालावा, ज्यामुळे आपल्या मनात त्या प्रकारचे भावनिर्माण होतील. मूर्तिपूजा करायची नाही केवळ प्रणाम करणे हा प्रकार. कोणत्याही पूजेत मोडत नाही, तर तो भक्तांच्या मनात श्रद्धा दृढ़ करण्यासाठी सहयोगी ठरतो. पूजा तर केवळ जे मुक्ती देणार आहेत, त्या गुरु व नाममंत्राची करायची आहे.
No comments:
Post a Comment